Supriya Sule : “…आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचं चित्र”; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Supriya Sule : या घटनेवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळित झालं आहे. मोठा गाजवाजा करून मुंबई पुणे मिसिंग लिंक तयार करण्यात आला. तिथे दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सरकाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घटनेवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र सर्व माध्यमांमधून दिसत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“खरं तर मला विश्वासच बसत नाही कि ज्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा इतका गाजावाजा करत कार्यक्रम झाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळे सगळ्यांनीच त्याचे कौतुक केलं. सध्या कॉस्टमध्ये पडायला नको कारण तो वेगळा विषय आहे. मात्र ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडीओ येतोय हे अतिशय चिंताजनक आहे.”
पुढे सुळे म्हणाल्या, “राज्यात या पूर्वीही पाऊस झाला आहे. मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं चित्र पूर्वी नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक आहे.”
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय? यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करणं अतिशय आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. राज्यात एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र सर्व माध्यमांमधून दिसत आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व इनफास्ट स्ट्रक्चरची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शक्य तेवढा प्रवास टाळा: खासदार सुप्रिया सुळे
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नैसर्गिक घटना घडत आहेत. या सगळ्या वातावरणात राज्यातील नागरिकांना सुप्रिया सुळे यांनी महत्वाचे आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, “माझी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे की या दिवसात शक्य तेवढा प्रवास टाळावा.”





