पॅलेस्टिनमध्ये सापडली पुरातन मूर्ती

गाझा पट्टी – पॅलेस्टिन प्रदेशात एका शेतात तब्बल अडीच हजार वर्षापूर्वीची एक पुरातन मूर्ती सापडली असून इतिहासातील प्रख्यात अशा कनानी देवीची ती मूर्ती असावी असा संशोधकांचा अंदाज आहे या देशाच्या इतिहासामध्ये कनानी देवी युद्धाची आणि प्रेमाची देवता म्हणून ओळखले जाते पॅलेस्टिनमधील खान युनूस नावाच्या जिल्ह्यामध्ये एका शेतात शेतकरी काम करत असताना खोदकामाच्या दरम्यान
या मूर्तीचा मुखवटा सापडला या शेतकऱ्याने पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी ही मूर्ती तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वीची असावी अशी शक्यता व्यक्त केली आहे त्या मूर्तीच्या चेहरेपट्टी वरून ती इतिहासामध्ये नेहमी उल्लेख होणाऱ्या कनानी देवीची मूर्ती असावी अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
या मूर्तीच्या चेहऱ्यावर नागाच्या आकाराचे डिझाईन आहे चुन्याच्या दगडापासून तयार करण्यात आलेली ही मूर्ती आता अल बाशा संग्रहालयात ठेवण्यात आली आहे गाझा पट्टीच्या ज्या भागामध्ये ही मूर्ती सापडली तो भाग कनानी देवीचा परिसर म्हणूनच ओळखला जातो.
अबू इज नावाच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये ही मूर्ती सापडली त्या शेतकऱ्याने ही मूर्ती माझ्या शेतात सापडली याचा मला अतिशय अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.





