Anaya Bangar : अनाया बांगरची क्रिकेटमध्ये कमबॅकची मागणी, आयसीसी-बीसीसीआयसमोर मोठे आव्हान!

Anaya Bangar urges ICC and BCCI : माजी भारतीय खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. अनाया पूर्वी मुलगा होती आणि तिचे नाव आर्यन होते. काही वर्षांपूर्वी तिने लिंगपरिवर्तन केले आणि आता ती मुलगी बनली आहे. सध्या अनाया ट्रान्सजेंडर महिला म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत. याच दरम्यान, तिने आयसीसी आणि बीसीसीआयकडे मोठी विनंती करत क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा दावा केला आहे.
अनायाची आयसीसी आणि बीसीसीआयकडे मोठी मागणी –
अनाया बांगरची आयसीसी आणि बीसीसीआयकडे मोठी मागणी केली आहे. क्रिकेट विश्वात आपले नाव कमावण्याची तिची इच्छा आहे. लिंगबदल प्रक्रियेच्या आधी ती क्रिकेट खेळत होती, पण सध्या तसे होत नाही. याच कारणास्तव तिने आयसीसी आणि बीसीसीआयला आवाहन करत एक व्हिडिओ तयार केला.
View this post on Instagram
त्यात ती म्हणाली, ‘मी प्रथमच हा अहवाल शेअर करत आहे. गेल्या वर्षभरात मला जे काही जाणवले, ते आता वैज्ञानिक पद्धतीने नोंदवले गेले आहे. मी हा अहवाल बीसीसीआय आणि आयसीसीकडे पाठवू इच्छिते, जेणेकरून चर्चा भीतीवर नव्हे, तर सत्य आणि तथ्यांवर आधारित होईल. माझा उद्देश कोणाला बाजूला करणे नाही, तर सर्वांसाठी जागा निर्माण करणे आहे.’
हेही वाचा – IND vs ENG : हेडिंग्लेवर युवा टीम इंडियाची खरी कसोटी! या मैदानावर कसा आहे भारताचा रेकॉर्ड? जाणून घ्या
अनायाला मैदानावर पुन्हा कमबॅक करायचयं –
मैदानावर पुन्हा पुनरागमन करू इच्छिणारी अनाया बांगर, जी यशस्वी जैयस्वाल आणि सर्फराझ खान यांच्यासोबत क्रिकेट खेळली आहे, तिने तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘विज्ञान सांगते की मी महिला क्रिकेटसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आता प्रश्न हा आहे की जग खरे ऐकण्यासाठी तयार आहे का?’ जेव्हा संजय बांगर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते, तेव्हा अनाया बांगरने भारतीय संघातील स्टार खेळाडूंसोबत सराव केला होता. याशिवाय, ती इंग्लंडमध्ये राहून काउंटी खेळणाऱ्या खेळाडूंसोबतही सराव करत आहे.





