अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूरचे झाले ‘ब्रेकअप’

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात होते. इतकंच नाही तर या कपलला एकत्रही पाहण्यात आलं आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. 1 महिन्यापूर्वी दोघांचे ब्रेक अप झाल्याची चर्चा आहे.
रिपोर्टनुसार, दोघांच्या कॉमन फ्रेंडने याबाबत सांगितले आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एक महिन्यापूर्वी वेगळे झाले आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दोन वर्षांहून अधिक काळ डेट करत होते, ते एका महिन्यापूर्वी वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या ‘ब्रेकअपमुळे त्यांच्या जवळच्या मित्रांना धक्का बसला आहे.’
गेल्या महिन्यात अनन्या पांडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक गुप्त पोस्ट शेअर केली होती. यानंतर अनन्या आणि आदित्यचे नाते संपुष्टात आल्याची शक्यता वर्तवली जात होती. जे खरोखर तुमचे आहे ते परत येईल, असे तिने पोस्टमध्ये लिहिले होते. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोच्या सेटवर अनन्या आणि आदित्यच्या नात्याचा खुलासा झाला होता. जिथे अभिनेत्रीने तिच्या रिलेशनशिपबद्दल हिंट दिली होती.





