‘भूल भुलैया 4’मध्ये अनन्या पांडे साकारणार ‘मंजुलिका’; ‘त्या’ पोस्टची सोशलवर रंगली चर्चा !

Ananya Panday | Manjulika | Bhool Bhulaiyaa 4 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया 2’ आणि ‘भूल भुलैया 3’मध्ये जबरदस्त कामगिरी करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता चाहत्यांमध्ये ‘भूल भुलैया 4’ची मोठी उत्सुकता आहे. मात्र या वेळी विद्या बालन आणि तब्बू यांची या फ्रँचायझीतून एक्झिट होण्याची चर्चा रंगली आहे. कारण मेकर्सना ‘नवी मंजुलिका’ मिळाल्याचे बोलले जात आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे!
अनन्या पांडेचं नाव कसं आलं चर्चेत?
अनन्या पांडेने ३० ऑक्टोबर रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. तिने आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबतचा सेलिब्रेशनचा एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला. पोस्टमध्ये अनन्याने लिहिलं, “हा वाढदिवस खूप खास होता, सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.”
या पोस्टवर कार्तिक आर्यननेही एक खास व्हिडिओ शेअर करत अनन्याला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा’ च्या शूटिंगदरम्यानचा बिहाइंड-द-सीन होता.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये अनन्या मजेत कार्तिकवर आरोप करते की, “तू माझं गाणं चित्रपटातून कापलं आहेस!” त्यावर कार्तिक म्हणतो, “तुझं गाणं? मी गाण्यात नाही का?” यावर अनन्या लगेच म्हणते, “आपलं गाणं!” कार्तिक तिच्या या उत्तरावर हसत म्हणतो, “तू तर सेल्फलेस को-स्टार आहेस!”
या मजेशीर संवादादरम्यान अनन्याने चेष्टेने म्हटलं की ती ‘पुढची मंजुलिका’ असू शकते. चाहत्यांनी हा उल्लेख पटकन पकडला आणि सोशल मीडियावर ‘भूल भुलैया 4’मध्ये अनन्या पांडे झळकणार का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. सध्या सोशल मीडियावर याची तुफान चर्चा रंगली आहे.
कार्तिक आर्यनने दिला खुलासा..
कार्तिकने स्पष्ट केलं की, अनन्याने हे फक्त मजेत म्हटले होते आणि सध्या ‘भूल भुलैया 4’च्या कास्टबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा मंजुलिका बद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.





