Anant-Radhika Wedding : ‘तुम्हाला भांडी घासायलाही…’; अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन सुषमा अंधारेंचा शेलारांना जोरदार टोला

Anant-Radhika Wedding | Tejas Thackeray | Sushma Andhare | Ashish Shelar : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याची सध्या लगबग सुरू आहे. या सोहळ्यातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव ‘तेजस ठाकरे’ यांनी डान्स केला आहे.
याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, शिंदे गट आणि भाजपकडून आता उद्धव ठाकरे आणि त्याचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्यावर टीका होत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. या लग्नसोहळ्यापूर्वीचे विधी त्यांच्या मुंबईतील घरी पार पडत आहेत. तर, बी. के. सी येथील ‘मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ येथे संगीतसोहळा पार पडला.
या संगीत सोहळ्याला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावत जोरदार थिरकल्याचं पाहायला मिळालं. राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
त्यात उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘ये लडकी हाय अल्लाह, हाय हाय रे अल्लाह’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आणि त्यावरूनच आता सत्ताधाऱ्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट केलं आहे.
या व्हिडिओवर बोलताना आशिष शेलार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही.. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत.
जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही..
ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत
जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही
“गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही..
तो… pic.twitter.com/u7ohexKiXL
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 9, 2024
जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही.. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आता, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही ट्विट करुन आशिष शेलार यांच्यावर तिखट शब्दात खोचक टीका केली. त्या म्हणाल्या ‘तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.
तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.
अमृताहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते.
बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का ?
@ShivSenaUBT_ @ShelarAshish https://t.co/vFThIAV3FU— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) July 10, 2024
अमृतावहिनी जशा राजकारणात नाहीत, त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का?, असा सवालही आशिष शेलार यांना टॅग करुन सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
शीतल म्हात्रे यांनी साधला निशाणा….
अरे… अंबानींच्या लग्नातला हा background डान्सर ओळखीचा दिसतोय…
.
.
हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव,
तेजस ठाकरे …
.
उत्तम कला आहे एकेकाजवळ …
वडील नटसम्राट … लेक नृत्यसम्राट… #एकापेक्षाएक pic.twitter.com/4Li74EstYu— sheetal mhatre (@sheetalmhatre1) July 9, 2024
“अरे… अंबानींच्या लग्नातला हा background डान्सर ओळखीचा दिसतोय… हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे … उत्तम कला आहे एकेकाजवळ … वडील नटसम्राट … लेक नृत्यसम्राट…”, अशी टीका शिंदे गटाच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.





