आनंद शिंदे भडकले,’आमदारकीच्या यादीतून नाव वगळलं तर मी राज्यपालांवर केस करेन’
Updated On:

मुंबई – विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने नवी यादी दिली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिंदे यांची कलावंतांच्या कोट्यातून राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
दरम्यान, ‘विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून मला डावललं तर मी राज्यपालांवर केस करेन. मी गप्प बसणार नाही. कारण, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ता आणि गायक आहे, असे आव्हान ज्येष्ठ गायक आणि राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून शिफारस झालेले आनंद शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले.





