मंचर, (प्रतिनिधी) – कळंब ता. आंबेगाव येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेमध्ये बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १९४ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकूण ६० दुकानांची मांडणी केली होती. यातून जवळपास ३० हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव यांनी दिली. बाल आनंद मेळावानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी उपसरपंच गंगाराम भालेराव, माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भालेराव, उपाध्यक्ष प्रिया भालेराव, शिक्षक माता पालक संघाचे उपाध्यक्ष निलेश कानडे, मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, राजेंद्र भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बाळासाहेब भालेराव, इसाक शेख, सोनल कहडणे, राजश्री भालेराव, मनिषा साळवे यांच्यासह पालक, ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक संतोष कानडे, गणेश लोहकरे, शिक्षिका गीतांजली शेलार, मीना निऱ्हाळी, सुनीता चासकर यांनी केले.