स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने फेकला लाल रंग; शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप

Meenatai Thackeray | मुंबईमधील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पुतळ्याची सफाई करण्यात आली. तसेच आरोपीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे. शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी गर्दी केली असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
‘सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी’
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई घटनास्थळी दाखल झाले. यावेळी देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, “काही समाजकंटकांनी पुतळ्यावर रंग फेकला आहे. कदाचित या भेकडाच्या अवलादींवर संस्कार झालेले नसतील. पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. अशा घटना पाहून पोलीस यंत्रणा काय करत आहे? सरकार काय करतंय? असे प्रश्न पडतात. सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे.” दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली.Meenatai Thackeray |
माँसाहेब म्हणून ओळख
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांना माँसाहेब म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. 1995 मध्ये मीनाताईंचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पवित्र स्मृतींमध्ये या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही याच परिसरात आहे.
मात्र शिवाजी पार्कसारख्या सकाळीही गजबजलेल्या परिसरात या भागात अनेक जण मॉर्निंग वॉकला येतात. मात्र पोलीस बंदोबस्त असलेल्या भागात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा :
Devendra Fadnavis : मिलिंद नार्वेकरांचा फोन आला अन्….; CM फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, काय घडलं होतं?





