पुणे जिल्हा | पडवळ कुटुंबीयांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ

लोणी धामणी, (वार्ताहर) – खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील वडदरा या ठिकाणी पाच दिवसापूर्वी संतोष व बबूशा पडवळ यांच्या झोपड्या दिवसा ढवळ्या अज्ञात व्यक्तिने पेटवून दिल्या होत्या. या घटनेचे वृत कळताच अनेकांनी पडवळ कुटूंबाला मदतीचा हात पुढे केला.
पडवळ कुटुंबीयांना सर्व स्तरातून मदत मिळत आहे. बाबुशा पडवळ यांच्या भारती आणि आरती या दोनही मुलींची शालेय फी माफ करण्यात आली आहे. तसेच शाळेकडून गणवेश, वह्या पुस्तके देण्यात आले आहे.
पहाडदरा (ता.आंबेगाव) येथील स्वर्गीय रामभाऊ राधू वाघ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संसार उपयोगी वस्तूंचे वाटप केंद्रीय अर्थ मंत्रालय सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. अशोक पगारिया, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,
पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, रामदास जाधव, विलास पगारिया,शांताराम जाधव, प्रमोद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. तर खडकवाडी ग्रामस्थांकडून गहू, तांदूळ, बाजरी, किराणा साहित्य तसेच आर्थिक मदत करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच सावळेराम नाईक कपड्याचे व्यापारी टिल्लु कोचर, सुधीर सोनार, दादाभाऊ धुमाळ, संजय सुक्रे, हरिभाऊ धुमाळ, तसेच ग्रामस्थांनी गहू, तांदूळ, बाजरी,किराणा साहित्य पुरविण्यात आले.
तसेच अर्थिक मदत डॉ. सिनलकर, काशिनाथ वाळुंज यांच्याकडून करण्यात आली. यावेळी माजी सरपंच अनिल डोके, माजी चेअरमन नाथा सुक्रे, गुलाब वाळुंज,दिलीप डोके, एकनाथ सुक्रे, वसंत भागवत, नथू सूक्रे,वैभव सु्क्रे उपस्थित होते.





