पुण्यातील वाघोलीसाठी भामाआसखेडच्या पाण्याचाही पर्याय

प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 27 – भामाआसखेड योजनेचे पाणी वाघोलीपर्यंत आणणे शक्य आहे. नगररस्ता भागासाठी भामाआसखेडच्या पाण्याचे नियोजन असताना महापालिकेत समावेश झालेल्या वाघोलीवर पाण्याबाबत अन्याय करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केली आहे.
महापालिकेत वाघोली गावाचा समावेश करण्यात आल्यानंतर पाणीपुरवठा संदर्भात कटके आयुक्तांकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यानुसार भामाआसखेड पाण्याबाबतचा पर्यायही त्यांनी आयुक्तांकडे मांडला आहे.
कटके म्हणाले की, पाणीपुरवठा योजनेबाबत वाघोलीवर अन्याय झाला आहे. जागतिक बॅंक पाणीपुरवठा योजना राबवितानाही योजनेचा 30 टक्के खर्च ग्रामपंचायतीवर शासनाने लादला होता. वास्तविक या योजनेचा लाभ वाघोलीपेक्षा चंदननगर, खराडी, वडगावशेरी या भागालाच अधिक झाला. या योजनेची पाणीपट्टी (कर) भरण्याचा दबावही ग्रामपंचायतीवर होता. परंतु, योजनेचे पाणी आलेच नाही तर कर कसा भरणार? यामुळे गावाने स्वत:ची पाणी योजना राबविताना पीएमआरडीच्या माध्यमातूनही 25 कोटींची पाणी योजना राबविली आहे. परंतु, वाघोलीचे वाढते नागरीकरण तसेच गृहप्रकल्पांची
“ग्रॅव्हिटी’ने आणता येईल पाणी…
भामा-आसखेड प्रकल्पातून नगर रस्ता परिसरात धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी या परिसरात भामाआसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. भामाआसखेड धरणातून 8 कि.मी.पर्यंत पाणी जॅकवेलने पंपिंग करून आणले आहे तर पुढे 34 कि.मी. पर्यंत पाणी पाइपलाइन ग्रॅव्हिटीने आणलेले आहे, असाच प्रयोग वाघोलीपर्यंत करावा, याकरिता वाढीव निधीचीही गरज नसल्याच्या तांत्रिक बाबी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.





