‘मायलेक’ चित्रपटासाठी अमृताची खास पोस्ट; म्हणाली “माझ्या हृदयाच्या दोन तुकड्यांची…”

Amruta Khanvilkar post| अभिनेत्री सोनाली खरे हिचा ‘मायलेक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विशेष म्हणजे सोनालीची लेक सनायाने या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर शोला अमृता खानविलकरने देखील हजेरी लावली होती. यानंतर आता ‘मायलेक’ या चित्रपटासाठी अमृता खानविलकरने खास पोस्ट शेअर केली आहे.
अमृताने सोशल मीडियावर सनाया आणि सोनालीसोबतचा फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहले की, ‘मायलेक चित्रपट पाहणं हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. माझ्या हृदयाच्या दोन तुकड्यांची एक चढ-उतार आणि इमोशन्सने भरलेला प्रवास पाहायचा होता. या चित्रपटातून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे कितीही काहीही होऊ दे, तुम्ही कुठेही असो, पण तुमची माणसं आणि तुमची आई नेहमी तुमच्यासोबत असते.’
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले, ‘सनायाचा चित्रपटातील कामाने मला खरच रडवलं. सनया मी आणि तुझी आजी चित्रपटाच्या शेवटच्या सीनला रडत होतो. आयुष्यात कितीही दुःख आले तरीही पुढे चालत जा. प्रार्थना करत राहा. हेच तुला आयुष्यात हवे आहे. मला तुझ्यावर खूप जास्त अभिमान आहे’, असे अमृताने पोस्ट शेअर करत लिहिले आहे. Amruta Khanvilkar post|
दरम्यान, अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींचे एकत्र सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सोनालीची लेक सनायावर देखील अमृताचा खुपच जीव आहे. यातच आता सनायाने नवी सुरूवात केल्याने अमृताने या पोस्टद्वारे तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘मायलेक’ चित्रपटात सोनाली खरे, उमेश कामत आणि सनाया मुख्य भूमिकेत असून १९ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. Amruta Khanvilkar post|
हेही वाचा:





