Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता फडणवीस काय म्हणाल्या, एकदा पाहाच….

Amruta Fadnavis | Devendra Fadnavis : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी हा निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे. महायुतीला दणदणीत यश मिळालं असून, महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली आहे.
भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 54 जागांवर आघाडीवर आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे.
40 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र दुसरीकेड महाविकास आघाडीला जबर पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्ष मिळून 75 चा आकडा देखील गाठू शकलेले नाहीत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार सत्तेत येणार आहे. दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मला इतकं माहितीय की सर्वांनी मिळून चांगलं काम केलंय.
आता मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतेल. महाराष्ट्रासाठी जे चांगलं असेल तो निर्णय सर्व नेते मिळून घेतील.’ असं त्या म्हणाल्या.
विजय मिळेल हे माहिती होतं. अशाप्रकारचा भूकंप आणणारा विजय अनपेक्षित होता. पण ज्याप्रकारे निकाल लागला ते पाहून आनंदी झाला. कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला. सर्वांनी एकत्र मिळून काम केलं, त्यामुळे विजय साकार झाल्याचे त्या म्हणाल्या.
मला प्रचार करण्यासाठी 24 तास कमी पडत होते. मी नागपूरमध्ये सर्व कार्यकर्त्यांसोबत काम करत होती, असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
मुख्यमत्रीपदासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“यासंदर्भात (मुख्यमंत्री पदासंदर्भात) अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्यमत्रीपद हे कुठल्याही निकशावर नाही, तर मुख्यमंत्रीपद हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील.
एकनाथराव शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजित दादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आमचे पार्लमेटरी बोर्ड नियुक्त करते. ते बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. कुठलाही वाद नाहीये, कुठलाही विवाद नाहीये. असं फडणवीस म्हणाले आहेत.





