Amruta Khanvilkar Hand Injury | अभिनेत्री अमृता खानविलकरला ‘चंद्रा’ व्यक्तिरेखामुळे एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयासह ती एक उत्तम नृत्यांगना आहे. तिच्या नृत्याचे लाखो लोक दिवाणे आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांना आपल्या नव्या सिनेमाची किंवा नव्या प्रॉजेक्टची माहिती अमृता शेअर करत असते. मात्र तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिच्या हाताला पट्टी बांधलेली असून तिला दुखापत झाली असल्याचे दिसते. एका फोटोमध्ये तिच्या हाताला सूज आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हाताला पट्टी बांधलेली पाहायला मिळत आहे. अमृताने फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलंय की, “अजूनही यातून रिकव्हर होत आहे. तुम्ही जे पाहताय आणि तुम्ही जे पाहू शकत नाही. फक्त पुढे चालत राहा.” अमृताच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. या पोस्टवर एका चाहत्याने “माइल्ड फ्रॅक्चर झालंय का?” असे विचारले. त्यावर अभिनेत्री म्हणाली, “फ्रॅक्चर नाही, हातातील सॉफ्ट टिशू डॅमेज झाले.” सध्या चाहत्यांसह सहकलाकार मंडळी देखील अमृताला काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, अमृता खानविलकर सध्या ‘लाईक आणि सबस्क्राइब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.