Amravati News : कुलूप तोडून घेतला खासदार कार्यालयाचा ताबा; यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांत बाचाबाची

Amravati News – लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा दारुण पराभव झाला. या जागी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानख़डे हे विजयी झाले. परंतु हा वाद अद्याप शमलेला नाही. आता अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद पेटला आहे.
काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार कार्यालयाचे कुलूप तोडले आहे. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि काही कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. खासदार कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्याने यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आणि कुलूप तोडले.
संतापलेल्या यशोमती ठाकूर यांनी यावेळी चंद्रकात पाटील यांना सुनावले. “ही खासदारांशी वागण्याशी पद्धत नाही, अशी आठवण अधिकाऱ्यांना करुन दिली. तुम्ही आमच्यावर हवे तर गुन्हे दाखल करा. आम्ही तुम्हाला सांगून ऑफिस ताब्यात घेत आहोत’, असेही त्या चंद्रकांत पाटलांना म्हणाल्या.





