Amol Mitkari : अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात…; अमोल मिटकरी भडकले, पक्षाला दिला घरचा आहेर, ट्विट चर्चेत !

Amol Mitkari । Maharashtra Assembly Election 2024 – अभूतपूर्व यश मिळवून महाराष्ट्राची सत्ता राखल्यानंतरही महायुतीला अद्याप नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मुहूर्त मिळालेला नाही. त्यातून मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाल्याने शपथविधी रखडल्याचे मानले जाऊ लागले आहे. आता महाराष्ट्रातील पेचावर दिल्लीतून तोडगा काढला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाविजय मिळवणारी महायुती तातडीने सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करेल असे मानले जात होते. प्रत्यक्षात निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही सरकार स्थापनेविषयी सस्पेन्स कायम आहे. असताना दुसरीकडे मात्र अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस वाढली झाल्याचं दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उल्लेखनीय यश मिळवले. पक्षाने ४६ जागा जिंकल्या, ज्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाचे कौतुक झाले. त्यांच्या मेहनतीचा हा विजय मानला जात आहे. निवडणुकीतील या यशानंतर अजित पवारांचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांनी त्यांचे अभिनंदन केले. या फोटोसोबत तीन ओळींचे खास कॅप्शन दिले. ‘महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला’ असं होत.
नरेश अरोरा यांनी अजित पवारांसोबत फोटो काढला, ज्यामध्ये अरोरा यांनी पवारांच्या खांद्यावर हात ठेवला होता. हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी चांगलेच संतापले आहे. त्यांनी उघडपणे संताप व्यक्त करत विचारले,
“अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत नरेश अरोरांना कशी झाली?” असं ते म्हणाले आहेत. ट्विटकरत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण नंतर मात्र मिटकरी यांनी हे ट्विट डिलीट केल्याचं दिसून येत आहे.
हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. #सॅलरीसोल्जर https://t.co/wZl7kOn7bj
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 26, 2024
दरम्यान, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत म्हटले, “श्री. अमोल मिटकरी यांचे वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, त्याचा पक्षाशी संबंध नाही. डिझाईन बॉक्स टीमने निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली आहे. “या वक्तव्यानंतर मिटकरी आणखी चिडले.
त्यांनी म्हटले, “हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे. आमचा साधा प्रश्न आहे, अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा….”
ही आहे महाराष्ट्राची संस्कृती.. छत्रपतींचे वारसदार दादांच्या खांद्यावर शाल टाकताहेत हात नाही… pic.twitter.com/rqkAe5iYGZ
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 26, 2024
या सोबत त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांचा सत्कार करताना दिसत आहेत. “ही आहे महाराष्ट्राची संस्कृती.. छत्रपतींचे वारसदार दादांच्या खांद्यावर शाल टाकताहेत हात नाही…’ असं ट्विट मिटकरी यांनी केलं आहे.





