अमोल कचरे यांचे निधन
Updated On:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माध्यम समन्वयक अमोल कचरे (वय ३४) यांचे बुधवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
कचरे यांच्यावर बुधवारी एक शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली. संबंधित रुग्णालयात आयसीयू नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला.परंतु, कार्डियाक अॅम्बुलन्स वेळेत उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना साध्या अॅम्बुलन्समधून इनामदार रुग्णालयात नेताना त्यांचे निधन झाले.
अमोल कचरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून, गेले काही वर्ष ते पत्रकारितेत कार्यरत होते. त्यांची नुकतीच काही महिन्यांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या माध्यम समन्वयपदी निवड झाली होती.





