‘पंचायत 4’मध्ये होणार अमिताभ बच्चन यांची एन्ट्री? थेट पोहचले ‘फुलेरा’ गावात

Amitabh bachchan photo from phulera village | ‘पंचायत’ वेबसीरिज अनेकांच्या पसंतीस पडली. ‘पंचायत’चे तीनही सीझन चांगलेच गाजले. यातील कथा आणि कलाकरांच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक झाले. यानंतर आता ‘पंचायत 4’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या याचे शुटींग सुरू असून नुकताच सेटवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फुलेरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयातून तर दुसरा आमदारांच्या घरातील हे व्हिडिओ आहेत. ज्यात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन फुलेरा गावात दिसत आहेत. यानंतर आता पंचायतच्या पुढच्या सीझनमध्ये बिग बींनी कॅमिओमध्ये दिसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
खरं तर, अमिताभ बच्चन हे सायबर जनजागृतीविषयी भारत सरकारच्या एका जाहिरातीसाठी ‘पंचायत ४’च्या सेटवर गेले होते. तिथे त्यांनी ‘पंचायत’मध्ये विधायकाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज झा आणि विकाससोबत शूटिंग केलं. याशिवाय सेटवरील इतर कलाकारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला.
हे व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘सावध रहा, सतर्क रहा. नेहमी फक्त SEBI मंजूर ॲप वापरा. मदतीसाठी सायबर मित्रला 1930 वर कॉल करा.’ फसवणूकीपासून सावध राहण्यासाठी जनजागृती केली आहे. दरम्यान, ‘पंचायत ४’ वेबसीरिजचं सध्या शूटिंग सुरु असून ही सीरिज पुढील वर्षी २०२६ मध्ये भेटीला येण्याची शक्यता आहे.
अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचे कल्की 2998 AD या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले होते. या चित्रपटात दीपिका पदुकोण, प्रभास आणि कमल हसनसारखे स्टार्स होते.





