अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांवरून अमिताभ बच्चन संतापले? म्हणाले “मूर्ख…”

Amitabh Bachchan Post | अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या मागील काही दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. यातच आता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरील ब्लॉगच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक विषयांवर ते आपले मत मांडताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमी नाही,’ असं म्हटलेआहे.
अमिताभ यांची ही पोस्ट अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान समोर आली आहे. अमिताभ यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “या जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमतरता नाही. हे असे लोक आहेत, जे इतरांबद्दल खोट्या किंवा बनावट गोष्टी पसरवत असतात. असे लोक इतरांच्या आडून स्वतःचे दुष्कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतात. अशी माहिती पसरवणाऱ्यांच्या व्यवसायाला मी आव्हान देणार नाही आणि समाजसेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करेल.”
पुढे त्यांनी म्हटलं की, “तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुम्ही दिलेला हा खोटा कंटेंट भविष्यासाठीही तयार केला जात आहे. जेव्हा लोक अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देतात तेव्हा अशा गोष्टी आपोआप वाढतात आणि लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. काही काळानंतर, हा व्यवसाय बनतो.”
T 5216 – बनाने वाले जो हर शब्द का अपना ही अर्थ निकलते हैं , अपने निजी जीवन के अनर्थ को छिपाते हैं 🤣
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 7, 2024
अमिताभ यांनी त्यानंतर एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “जे प्रत्येक शब्दाचा स्वतःचा अर्थ काढतात, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनर्थ लपवत असतात.” या पोस्टमध्ये त्यांनी हसणारा इमोजी वापरला. याआधी देखील अमिताभ बच्चन यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांवर तीव्र रोष व्यक्त केला होता.
दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक मागील अनेक दिवसांपासून कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसत नाहीत. तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.





