Amitabh Bachchan : आमिताभ यांनी जवळच्या व्यक्तीला गमावलं; पोस्टमध्ये दुःख व्यक्त करत म्हणाले “एक एक करून सगळे…. “
Amitabh Bachchan : सोशल मीडियावर आमिताभ बच्चन यांनी भावूक पोस्ट करत जवळच्या मित्राचे निधन झाल्याचे सांगितले आहे. चाहत्यांनी या पोस्टवरुन दुःख व्यक्त केले आहे.

Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिलेले आहेत. वय झाले असातानाही आजही ते तितक्याच ताकदीने मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा वावर सतत असतो. ते नेहमी पोस्ट करत असतात. त्यांच्या डेली रुटीनबाबत ते चाहत्यांना सांगत असतात.
चित्रपटसृष्टीत काम करताना अमिताभ यांना अनेक मित्र भेटले. काही हयात आहेत तर काहींनी जगाचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियावरून अमिताभ यांनी भावूक पोस्ट शेअर करत जवळची व्यक्ती (मित्र) सोडून गेल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा : Top 10 news: जय पवारांवरही दबाव-रोहित पवार, अमेरिकेचे लष्करी विमान KC-135 कोसळलं, वाचा अशा टॉप १० बातम्या
पोस्टमध्ये अमिताभ म्हणतात “मी आणखी एक प्रिय मित्र गमावला आहे. तो प्रेमळ आणि आनंदी होता. तो असा माणूस होता जो प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा राहू शकत होता. तो सर्वात कठीण काळातही मार्ग काढू शकत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं. तो गेला आहे यावर मला विश्वासच बसत नाहीये.
पुढे त्यांनी एक एक करून सगळे सोडून जात आहेत, अशी भावनिक ओळ लिहून दुःख व्यक्त केले आहे. मात्र, या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या कोणत्या मित्राला गमावले आहे, त्याचे नाव सांगितलेले नाही.
त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडलेला आहे की आमिताभ यांनी पोस्ट मित्र गेल्याचे सांगितले असून तो मित्र नेमका कोण आहे? त्याला नेमकं काय झाले होते? या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत दुःख व्यक्त केले आहे. तसेच मित्राच्या आत्म्याला शांती लाबो असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.






