बिग बींनी सुचवले ‘Selfie’ला नवीन नाव

मुंबई – बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरून ते सतत काहीतरी पोस्ट शेअर करत असतात. अमिताभ यांनी नुकताच त्यांच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून मी Selfie या इंग्रजी शब्दाला हिंदी शब्द शोधण्याच्या प्रयत्नात होतो. मात्र, मला अनेकांनी शब्द सुचवले मी त्या शब्दांशी पूर्णपणे सहमत नव्हतो. म्हणून आता मी स्वत: selfie या शब्दासाठी हिंदी शब्द तयार केला आहे आणि तो आहे. ‘वदय सह उसच….. व्यतिगत दूरभाषित यंत्र से हस्त उत्पादित स्व चित्र’. असं त्यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, अमिताभ यांच्या क्रिएटीविटीला चाहत्यांनी देखील चांगलीच दाद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.