Girish Mahajan on Amit Thackeray | भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष केला जात आहे. याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी खंत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळला पाहिजे, थोडा संयम बाळगावा, अशी विनंती अमित ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. अमित ठाकरे यांच्या या पत्रावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? “संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केलं आहे. तुम्हाला आता रिझल्ट पाहिजे, उत्तर पत्रिका पाहिजे, हा सगळा बालिशपणा सुरु आहे, तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? हे लोक प्रसिद्धीसाठी असे पत्र का लिहितात? हे मला काही कळत नाही. पत्र लिहिण्याची काही आवश्यकता नाही,” असे गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. Girish Mahajan on Amit Thackeray बीडमध्ये एका टोळक्याकडून शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यावर देखील महाजन यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सुद्धा ही बातमी बघितली खूप अमानुषपणे त्या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे, अधिक कठोर कारवाई होईल. समाजामध्ये मानसिक विकृतीच एवढी वाढली आहे? तर त्याला आता कोण काय करणार? मात्र यापुढे असे गुन्हे होणार नाहीत, याबाबत पोलीस कडक कारवाई करतील,” असं महाजन यांनी म्हटलं आहे. Girish Mahajan on Amit Thackeray | दुसरीकडे, अमित ठाकरे यांच्या पत्रावर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानवर जो यशस्वी हल्ला केला, त्याच आम्ही अभिनंदन करतो. मात्र, या दरम्यान एकाही देशाने पाठिंबा दिला नाही. शशी थरूर यांना मध्यस्थी करावी लागली. पहेलगाम ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत सर्वच चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे या यात्रांकडे तसं पाहिलं पाहिजे, “असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. Girish Mahajan on Amit Thackeray | हेही वाचा: Chhagan Bhujbal : अखेर ‘तो’ दिवस उजाडला; छगन भुजबळांचा आज शपथविधी; कोणतं खात मिळणार?