अमित शहांची ‘ती’ शायरी फडणवीसांनी केली कॉपी
Updated On:

मुंबई- काल विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शेअर सादर केला होता. “मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारें पें घर मत बसा देना… मैं समंदर हूँ, लोटकर वापस आऊंगा” अशा शब्दांत फणवीस यांनी सरकारला इशारा दिला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा शेर यापूर्वी देखील एका राजकीय नेत्यानी सादर केला होता. हा राजकीय नेता दुसरा तिसरा कोणी नसून भाजप अध्यक्ष ‘अमित शहा’ यांनी सात वर्षांनी पूर्वी गुजरातमध्ये म्हटल्याचं समोर आलं आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर सभागृहातील सर्व नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त करताना पुन्हा एकदा तोच शेर सादर केला होता.





