Amit Shah : महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे बहुभाषीक राज्य : अमित शहा
Amit Shah : "महाराष्ट्राच्या भूमीवर मराठी भाषेचा सर्वोच्च सन्मान आहेच आणि तो असायलाच हवा. मात्र, त्याचबरोबर या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड आणि वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला असून त्यांचा सन्मानही केला गेला आहे.

Amit Shah : महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला आहे आणि त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात दुसरे नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. (Amit Shah)
नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि सहावे अखिल राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. (Amit Shah)
अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीलाही मी प्रणाम करू इच्छितो. येथे मराठीचा सन्मान आहे आणि तो असायलाच हवा. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मराठीला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले. (Amit Shah)
मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला आहे आणि त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात दुसरे नाही. (Amit Shah)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी महाराष्ट्राच्या शासनव्यवस्थेत सर्व भाषांना स्वीकारण्याची आणि सन्मान देण्याची व्यापक दृष्टी ठेवली आहे असे, ते म्हणाले. (Amit Shah)
Amit Shah : “२१ राज्यांत २०२९ पूर्वी यूसीसी लागू करणार” – अमित शहा




