Amit Shah : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणायची चूक केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना महागात पडल्याचे दिसत आहे. यावरून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी गोयल यांना फटकारले आहे. अमित शहांनी यावरुन नाराजी व्यक्त केल्याची माहितीही आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्रे कुणाच्या हाती जाणार याबाबत चर्चा सुरू होती. अशातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यावर भाष्य केले होते. गोयल यांनी प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे म्हटले होते. त्यावेळी पियुष गोयल यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. स्वतः प्रफुल पटेल यांनी यावर नाराजी व्यक्त करत, तसा कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती दिली होती. यावरूनच भाजपचा निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप होत आहे का? अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळेच शहा यांनी यावरुन नाराजी व्यक्त करत, गोयल यांना फटकारले आहे. दरम्यान, पियुष गोयल यांनी आधीच यावरुन माफी मागितली आहे. Piyush Goyal मी सोडून अन्य कोणतीही व्यक्ती असेल : प्रफुल पटेल दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मी सोडून अन्य कोणतीही व्यक्ती असेल. ती व्यक्ती योग्य असेल. मात्र, काहीजण उलटसुलट चर्चा करत आहेत. यामध्ये काही तथ्य नाही. मी कधीही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नव्हतो. मी किंवा आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याने मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले का? प्रफुल पटेल यांनी म्हटले.