Amit Shah : अजितदादा महायुतीत का आले? अमित शाहांनी उलगडला ‘त्या’ खास संवादाचा किस्सा
Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय नेमका का घेतला, याबाबत अनेक वर्षे तर्कवितर्क लावले जात होते.

Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. (Amit Shah)
अजितदादांनी एवढा मोठा राजकीय निर्णय नेमका का घेतला, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी अजितदादांच्या महायुती प्रवेशामागील कारण सांगितले आहे. (Amit Shah)
पुण्यात दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना महायुतीत सहभागी होण्याच्या निर्णयावेळी झालेल्या संवादाचा किस्सा सांगितला. (Amit Shah)
‘सत्ता येते-जाते, मग एवढा मोठा निर्णय का?’
अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटल्याचे अमित शाह यांनी सांगितले. त्यावेळी आपण अजितदादांना थेट विचारले होते की, तुमची एक राजकीय पार्श्वभूमी आहे. तुमच्या या निर्णयामुळे जनतेलाही धक्का बसेल. सत्ता येते-जाते, मग तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेत आहात? (Amit Shah)
यावर अजित पवार यांनी शांतपणे उत्तर दिले होते. ‘अमित भाई, प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचा विकास आणि महायुती या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येणार नाहीत. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाशी जोडून घ्यायचे आहे. त्यामुळे मला महायुतीचा सदस्य व्हायचे आहे,’ असे अजितदादांनी सांगितल्याचा खुलासा अमित शाह यांनी केला. (Amit Shah)
‘कार्यकर्त्यांसाठी भांडणारा नेता वेगळाच असतो’
अजितदादांचा महायुतीत येण्याचा निर्णय काहीसा उशिरा झाला. त्यापूर्वी दोन-तीन वेळा प्रयत्न अयशस्वी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आल्यानंतर अजित पवार यांच्याशी आपली घनिष्ठ मैत्री निर्माण झाल्याचे शाह म्हणाले. (Amit Shah)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात अजितदादा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आपल्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संयमाने चर्चा करत असत. कार्यकर्त्यांसाठी भूमिका घेणारा नेता वेगळाच असतो. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर अनेक जण स्वतःचे हितसंबंध पाहतात; मात्र अजितदादा नेहमी आपल्या कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याला महत्त्व देत होते, असेही अमित शाह यांनी नमूद केले. (Amit Shah)
‘दादांमुळे महायुतीला स्थिरता आली’
अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर आघाडीला स्थिरता आणि सातत्य मिळाले. त्यामुळे सरकारला अनेक कठोर निर्णय घेणे शक्य झाले आणि महाराष्ट्राचे सरकार चांगल्या पद्धतीने चालले, असे अमित शाह म्हणाले. (Amit Shah)
अजितदादांच्या निधनाच्या घटनेची आठवण सांगताना शाह भावूक झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून दुर्घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने मनाला मोठा धक्का बसला. काम करणारा माणूस वेळेच्या आधीच निघून गेला, ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. (Amit Shah)
अजितदादांची कार्यपद्धती तरुणांसाठी आदर्श
संवेदनशीलतेने काम करणे, लोकांशी आपुलकीने वागणे, नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे, शिस्त पाळणे आणि वेळेचे महत्त्व जाणणे ही अजित पवार यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती. राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी त्यांची ही कार्यपद्धती आदर्श ठरेल, असेही अमित शाह यांनी सांगितले. (Amit Shah)
Amit Shah : अमित शाह यांच्या भेटीसाठी ऑटो-टॅक्सी चालकांचे शिष्टमंडळ आग्रही





