ट्रम्पच्या टॅरिफचा भारतावर काय परिणाम? ; अमित शहा म्हणाले”अशा बाह्य दबावांमुळे भारतीय…”

Amit Shah On US Tariff। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अमेरिकेकडून लादलेल्या टॅरिफविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टॅरीफविषयी बोलताना,”बाह्य दबाव भारतीय नागरिकांमध्ये भीती निर्माण करणार नाहीत. जागतिक अनिश्चितता असूनही, आपली देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत आहे. दिल्लीतील ‘रायझिंग इंडिया समिट’मध्ये बोलताना अमित शाह यांनी ही प्रतिक्रिया दिली. भारताची अर्थव्यवस्था अशा दबावांना तोंड देण्यास सक्षम असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहमंत्री यावेळी बोलताना, “कराचा परिणाम निश्चित करणे सध्या घाईचे ठरणार आहे. भारत हा एकमेव देश नाही जो टॅरिफचा सामना करत आहे. अनेक देश टॅरिफचा सामना करत आहेत. आपल्या वस्तू इतर देशांमध्ये देखील निर्यात केल्या जाऊ शकतात.” असे म्हणाले.
दबावाचा कोणताही परिणाम होणार नाही Amit Shah On US Tariff।
ते पुढे म्हणाले,”अमेरिकन टॅरिफ हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. घाईघाईने त्याचा परिणाम ठरवणे शहाणपणाचे नाही. भारताची अर्थव्यवस्था लवचिक आहे आणि अशा बाह्य दबावांमुळे भारतीय नागरिकांमध्ये भीती निर्माण होणार नाही याची खात्री शाह यांनी यावेळी दिली.
भारत अमेरिकेशी चर्चा करेल
दरम्यान, याविषयी बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी, भारत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर करातून सूट मिळवण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करेल. ” असे म्हटले आहे. भारताने या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्यास सहमती दर्शवली आहे.
आम्ही लवकरच ट्रम्प प्रशासनाशी बोलू Amit Shah On US Tariff।
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मते, अमेरिकेच्या परस्पर करांचा परिणाम अद्याप अज्ञात असल्याने नवी दिल्ली व्यापार करार निश्चित करण्याची योजना आखत आहे. “आम्ही लवकरच (डोनाल्ड) ट्रम्प प्रशासनाशी या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्याशी खूप मोकळेपणाने आणि रचनात्मकपणे वागलो, कारण ते आमच्यासोबत होते. आम्ही या वर्षाच्या अखेरीस द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करू यावर आमचे एकमत झाले,” असे त्यांनी आदल्या दिवशी एका कार्यक्रमात सांगितले.





