मोठी बातमी ! पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी ठार ; लोकसभेत अमित शाह यांची माहिती

Amit Shah On Opration Sindhoor । जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेव अंतर्गत ठार करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत याबाबत माहिती दिली. लोकसभेत कालपासून ‘ऑपरेशन सिंदूर‘वर चर्चा सुरु आहे. यावेळी अमित शाह यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय सैन्याचे ठार केल्याचे सांगितले.
ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रात्रे जप्त Amit Shah On Opration Sindhoor ।
गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत बोलताना, “पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना मारणाऱ्या तिन्ही दहशहतवाद्यांना मारण्यात आले. जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. सुलेमान, जिब्रान आणि अफझल हे दहशतवादी मारले गेले. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता, त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्यात”, माहिती अमित शाह यांनी दिली.
Union Home Minister Amit Shah says, “In a joint Operation Mahadev, the Indian Army, CRPF and J&K Police have neutralised three terrorists who were involved in the Pahalgam terror attack.” pic.twitter.com/jExoh3bhVj
— ANI (@ANI) July 29, 2025
22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत झाला होता हल्ला Amit Shah On Opration Sindhoor ।
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. पहलगामपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी लोकांची धार्मिक ओळख विचारून पर्यटकांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते.





