Commonwealth Games 2022 | पंघाल व थापा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सज्ज
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक स्टार खेळाडू व भारताचा अव्वल मुष्टियोद्धा अमित पंघाल व ऑलिम्पियन शिव थापा कसून सराव करत आहेत. हे दोघे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू असून या स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी सज्ज बनले आहेत.
अमित 51 किलो तर शिव थापा 63 किलो वजन गटाच्या निवड चाचणीत सहभाग घेत या स्पर्धेला पात्र ठरले आहेत. त्यांच्यासह मोहंमद हसमुद्दीन (57 किलो), रोहित टोकस (67 किलो), सुमीत (75 किलो), आशिषकुमार (80 किलो), संजित (92 किलो) आणि सागर (92 पेक्षा जास्त) यांच्या कामगिरीकडेही लक्ष राहणार आहे.





