राज्यात ‘मिनी चित्रपटगृह’ उभारणार – अमित देशमुख
Updated On:

मुंबई : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. चित्रपट महामंडळाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आश्वासन दिले.
मराठीत वेगवेगळ्या विषयांवर तयार होणारे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यात ‘मिनी चित्रपटगृह’ (मिनी मल्टीप्लेक्स) उभारण्यासारखे उपक्रम राबविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे अमित देशमुख म्हणाले.





