Amisha Patel : अमिषा पटेलने ‘गदर 3’ चित्रपटाची दिली अपडेट; म्हणाली “थिएटरमध्ये धुमाकूळ होणार…”
Gadar 3 : अमिषा पटेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इंस्टाग्रामवर शेअर करत 'गदर ३' नक्कीच बनवला जाईल, अशी पुष्टी केली आहे.

Amisha Patel : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर’ आणि ‘गदर २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. तारा सिंग (सनी देओल) आणि सकिना (अमिषा पटेल) यांची जोडी प्रेक्षकांच्या आजही पसंतीस उतरले. यातच आता अमिषा पटेलने ‘गदर ३’ चित्रपटाबाबत अपडेट दिली आहे.
अमिषा पटेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘गदर ३’ नक्कीच बनवला जाईल, अशी पुष्टी केली आहे. अमिषाने म्हटले आहे की, “गदर ३ नक्कीच येणार आहे आणि जेव्हा तो येईल, तेव्हा थिएटरमध्ये धुमाकूळ माजेल. प्रेक्षकांचे प्रेम आणि देवाच्या आशीर्वादामुळे ‘गदर’ सारख्या ब्रँडसाठी ५०० कोटींचे कलेक्शन आता एक सामान्य आकडा झाला आहे”. यावेळी चित्रपटाचा आवाका आणि पटकथा पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि धमाकेदार असेल, असेही तिने स्पष्ट केले.
GADAR 3 will come fr sure and JAB aayegi . Theatre mein hungama mach Jayega . With audiences love and gods blessings .. 500 cr is just the minimum nos at the box office for a brand like GADAR 👌👌🙏🏻❤️and this time the scale and script willl be even bigger and dhamakedar . Be…
— ameesha patel (@ameesha_patel) May 8, 2026
‘गदर ३’ व्यतिरिक्त अमिषा पटेल तिच्या गाजलेल्या ‘हमराज’ चित्रपटाच्या सिक्वेलमुळेही चर्चेत आहे. निर्माते रतन जैन यांनी ‘हमराज २’ साठी योग्य पटकथेचा शोध सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अमिषाचे एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचदरम्यान अमिषाने केलेल्या घोषणेनंतर आता ‘गदर ३’ मध्ये तारा सिंग नक्की काय धमाका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
Rakulpreet Singh: रकुल प्रीत सिंगची जंगल सफारी वादात; वन विभागाचे स्पष्टीकरण…





