Rakulpreet Singh: रकुल प्रीत सिंगची जंगल सफारी वादात; वन विभागाचे स्पष्टीकरण…
Rakulpreet Singh : रकुलचा व्हिडीओ समोर येताच तिने नियम मोडल्याची चर्चा रंगली.

Rakulpreet Singh: अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र एका चुकीमुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. हा व्हिडिओ गुजरातच्या गीर नॅशनल पार्कमधील आहे, ज्यामध्ये रकुल ‘बॅन झोन’मध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) फिरताना दिसत आहे.
रकुल तिच्या ‘पती पत्नी और वो २’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त गुजरातच्या प्रसिद्ध गिर नॅशनल पार्कमध्ये पोहोचली होती. तिच्यासोबत आयुष्मान खुराना, वामिका गब्बी आणि सारा अली खान हे कलाकारही तिथे गेले होते. मात्र, या सफारीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला.
या व्हिडिओमध्ये रकुल अभयारण्यात सक्ती असलेल्या ठिकाणी सफारी जीपच्या बाहेर फिरताना दिसत असल्याचं दिसलं. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गिर नॅशनल पार्क आणि सासन अभयारण्यासारख्या संरक्षित जंगल भागात सफारीदरम्यान पर्यटकांना गाडीतून उतरायला परवानगी नसते. त्यामुळे रकुलचा व्हिडीओ समोर येताच तिने नियम मोडल्याची चर्चा रंगली.
वन विभागाने दिलं स्पष्टीकरण
या व्हिडिओवरून आता सेलिब्रिटींच्या प्रतिबंधित क्षेत्रातील प्रवेशाबाबत वाद सुरू झाला आहे, ज्यावर आता गीर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनीही निवेदन प्रसिद्ध केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ हा सफारीच्या प्रतिबंधित जंगल क्षेत्रातील नसून एंट्री पॉइंटच्या बाहेर शूट करण्यात आला होता. त्या ठिकाणी सामान्य हालचालींना परवानगी असल्याने रकुलने कोणताही नियम मोडलेला नाही.
आम्ही स्पष्ट करतो की, हा व्हिडिओ प्रतिबंधित क्षेत्राच्या आतला नसून बाहेरचा आहे. अभयारण्याच्या आत गेल्यानंतर कोणालाही आपल्या सफारी गाडीतून बाहेर पडण्याची परवानगी दिली जात नाही. रकुलने संरक्षित जंगल भागात प्रवेशच केला नव्हता. त्यामुळे वन्यजीव नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
The alleged video being circulated is from outside the entry point of the Sanctuary area and not inside the restricted zone.@nkk_123 @choga_don pic.twitter.com/qeszY7YxJw
— DCFSasan-Gir (@dcfsasangir) May 10, 2026
‘पती पत्नी और वो २’ ची रिलीज डेट
‘पती पत्नी और वो २’ बद्दल बोलायचे झाले तर हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुराना, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’चा सीक्वेल आहे.
निर्मात्यांनी गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती, त्यानुसार हा चित्रपट ४ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु तो पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
हेही वाचा:
Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला ; निफ्टी ३०१ अंकांनी खाली





