Amir Jamal : ‘मला का वगळलं, स्पष्टीकरण द्या…’, आमिर जमालचा पीसीबी आणि निवड समितीवर हल्लाबोल

आमिर जमालने निवड समितीकडे मागितली स्पष्टता –
आमिर जमालने स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “माझी भविष्याच्या योजनांबाबत अद्याप कोणाशीही चर्चा झालेली नाही. मला याबाबत पूर्ण स्पष्टता हवी आहे. जर निवड समिती कोणत्याही फॉरमॅटमध्ये माझ्या नावाचा विचार करत नसेल, तर त्यामागील कारणे त्यांनी प्रामाणिकपणे सांगावीत. मी केवळ दुखापतीमुळे बाहेर होतो, पण मी माझी पूर्ण तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. मी पूर्ण लयीत गोलंदाजी करत आहे आणि 100 टक्के तंदुरुस्त आहे.”
Aamir Jamal expressed concern over selection silence, pointing out he has proven his recovery and fitness, but still lacks clarity on his future role.#TOKSports #AamirJamal pic.twitter.com/kbFphRQZyh
— TOK Sports (@TOKSports021) August 29, 2025
आमिर जमालच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा आढावा –
विशेष म्हणजे, पीसीबीने आमिर जमालला केवळ आशिया कपच्या संघातूनच वगळले नाही, तर त्याला 2025-26 च्या मध्यवर्ती करारातही कोणत्याही श्रेणीत स्थान दिलेले नाही. आमिर जमालने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 17 सामने खेळले आहेत, ज्यात 8 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने समाविष्ट आहेत. कसोटीत त्याने 352 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांत दोन डावांत केवळ 5 धावा केल्या. टी-20 मध्ये त्याने 88 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 26 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – PKL 2025 : अर्जुन देशवालचा जलवा! तमिळ थलाइवाजने पहिल्याच सामन्यात तेलुगू टायटन्सला चारली धूळ
पाकिस्तानच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह –
आमिर जमालच्या वगळण्याने पाकिस्तान क्रिकेटमधील निवड प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्याच्या निर्णयावरही टीका झाली होती. आता आमिरच्या वक्तव्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. पीसीबीच्या निवड समितीला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशी मागणी चाहत्यांमधून होत आहे.
हेही वाचा – PKL 2025 : अर्जुन देशवालचा जलवा! तमिळ थलाइवाजने पहिल्याच सामन्यात तेलुगू टायटन्सला चारली धूळ
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 12 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होईल, तर 14 सप्टेंबरला भारताविरुद्ध बहुचर्चित सामना खेळला जाईल. आता आमिर जमाल यांच्या नाराजीमुळे पीसीबीवर दबाव वाढला आहे की, त्यांना निवड प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणावी लागेल.





