पुणे जिल्हा | अमिनुद्दिन मुबारक शेख याने स्पर्धा परीक्षेत यश

पिरंगुट, (वार्ताहर) – येथील अमिनुद्दिन मुबारक शेख याने स्पर्धा परीक्षेत दोन वेगवेगळ्या पदांसाठी दिलेल्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. यानिमित्त त्याचा तर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच जिल्हा परिषदेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा दोन पदांना त्याने गवसणी घातली आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाला प्राधान्य दिले आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातील असलेला अमिनुद्दिन येथील ग्रामपंचायत पिरंगुट संचलित राजमाता जिजाऊ व माता रमाई ग्रंथालय व अभ्यासिकेतील विद्यार्थी आहे.
त्याचे इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले असून दहावीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूल या विद्यालयात झाले आहे.
माजी सरपंच दिलीप गोळे, माजी उपसरपंच व मुळशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राहुल पवळे यांच्या हस्ते त्याचा करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच प्रवीण कुंभार, युवा कार्यकर्ते संदीप कुंभार, ग्रामस्थ व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.





