Zeeshan Siddiqui : निकालाच्या धामधुमीत पार्थ पवारांचा मोठा निर्णय; झिशान सिद्दिकी यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Zeeshan Siddiqui : या सगळ्या धामधूमीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी पक्षातील आमदारावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Zeeshan Siddiqui : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकाच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. कालपासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. या सगळ्या धामधूमीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी पक्षातील आमदारावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
विधानपरिषदेचे आमदार झिशान बाबा सिद्दकी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश पार्थ पवार यांनी काढले असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या निकालात करण्यात आलेल्या या दोन नियुक्त्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
मागील विधानसभेची निवडणूक झिशान सिद्दकी यांनी लढवली होती. मात्र, त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेला संधी देण्यात आली. अनेक नावांची चर्चा असताना पक्षाकडून झशान सिद्धकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याची देखील मोठी चर्चा त्यावेळी झाली होती.
कोण आहेत झिशान सिद्दकी?
दिवंगत बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दकी आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी विधानसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात निवडणूक लढली होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
Abhijeet Bichukale : ‘बिग बॅास’फेम अभिजीत बिचुकलेंना मोठा धक्का! मिळाली फक्त इतकी मत





