अमेरिकन लोकांना भारताची संस्कृती आणि इतिहास जाणून घ्यायचाय – अमेरिकन राजदूत

वॉशिंग्टन – कोणत्याही देशाच्या नेत्यांनी फक्त नेतृत्व आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरच लोक स्वतःहून तुम्हाला मतदान करतील. मलाही निवडणुका आवडतात. राजदूत बनण्यापूर्वी मी एक नेताही होतो. पण निवडणुका ही अशी संधी असते जिथे लोक कोणत्याही गोष्टींवर नियंत्रण ठेवतात, हे सिद्ध करू शकतात. त्यामुळेच मला भारतातली जिवंत लोकशाही भुरळ घालते, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी केले आहे.
जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अमेरिकेत जिथे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे, तर भारतात संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याबाबत एरिक गार्सेटी म्हणतात की, कोणतीही निवडणूक खूप महत्त्वाची असते, हे कोणीही विसरता कामा नये.
गार्सेटी सध्या अमेरिकेत आहेत. गार्सेटी हे अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उगवते नेते मानले जातात आणि 2013 मध्ये लॉस एंजेलिसचे महापौर म्हणून निवडून आले होते. 2017 मध्ये ते पुन्हा लॉस एंजेलिसचे महापौर झाले. वयाच्या 42 व्या वर्षी लॉस एंजेलिसचे महापौर बनलेले गार्सेटी हे अमेरिकेतील सर्वात तरुण महापौर आहेत.
भारतातील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती होऊन केवळ साडेतीन महिने झाले आहेत, परंतु एवढ्या कमी कालावधीत गार्सेटी यांनी जबरदस्त सक्रियता दाखवली असून त्यांनी भारतातील डझनभर राज्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकल्यास ते भारतीय पाककृती आणि भारतीय संस्कृतीने किती प्रभावित आहेत हे लक्षात येते.
गार्सेटी म्हणाले की, निवडणूक हा एक क्षण असतो जेव्हा लोक उमेदवारांचे ऐकतात आणि त्यांच्या हिताच्या आधारावर निर्णय घेतात. मला भारतीय लोकशाहीचे चैतन्य आवडते. अमेरिकन लोकांना आता भारतीय आणि भारताची चांगली समज आहे. भारतीय खाद्यपदार्थांच्या आवडीबरोबरच, प्रत्येक चार अमेरिकन व्यक्तींपैकी एकावर भारतीय डॉक्टर उपचार करतात. आता अमेरिकन लोकांना भारताची संस्कृती, इतिहास जाणून घ्यायचा आहे. ज्यो बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे भारत समर्थक राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते दोन्ही देशांच्या क्षमता वाढवू इच्छित आहेत, असेही गार्सेटी म्हणाले.





