Katy Perry : अमेरिकन पॉप स्टारला उंचावरुन एन्ट्री घेणं पडलं महागात; मोठ्या संकटातून थोडक्यात वाचली…

Katy Perry : अमेरिकन पॉप स्टार केटी पेरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती एका मोठ्या संकटातून वाचली असल्याचे दिसत आहे. केटी पेरी लाईव्ह शोमध्ये फुलपाखरासारख्या आकाराच्या एका प्रॉपवर बसून परफॉर्म करत असते. मात्र तिची हटके एन्ट्री महागात पडली आहे. लाइव्ह शोमध्ये उंचावरुन एन्ट्री घेताना ती पडता पडता वाचली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये केटी पेरी लाईव्ह शोमध्ये फुलपाखरासारख्या आकाराच्या एका प्रॉपवर बसून गाणं म्हंटते. पण अचानक प्रॉप झटका देऊन खाली येतो. काही सेकंदांसाठी केटी पेरी खाली पडणार असे वाटते. पण सुदैवाने तसं काही घडत नाही. व्हिडीओमध्ये केटी पेरी उंचावरून खाली पडण्यापासून थोडक्यात बचावते.
केटी पेरीचा व्हायरल व्हिडीओ सॅन फ्रान्सिस्को शहरातील असल्याचे म्हटले जात आहे. केटी पेरी स्वत:ला सावरते आणि टीमला मी ठीक आहे, घाबरु नका असा संकेत देत पुन्हा परफॉर्म करायला सुरुवात करते.
या झटक्यानंतर केटी पेरीच्या चेहऱ्यावर भीती दिसते. लाइव्ह शोमध्ये ही घटना घडल्याने चाहतेही घाबरले होते. पण काही सेकंदांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील केटी पेरीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक यूजर्संनी ‘सेलिब्रिटी लोक असे जीवघेणे स्टंट का करतात?’ असे म्हटले आहे. सध्या तिचा हा व्हिडीव सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे





