“…तर तुम्हाला फ्रीमध्ये देऊ गोल्डन डोम” ; अमेरिकेची कॅनडाला अजब ऑफर

America on Canada । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला त्यांच्या प्रस्तावित १७५ अब्ज डॉलर्सच्या ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीमध्ये मोफत सामील होण्याचे आवाहन केले. पण त्यासाठी ट्रम्प यांनी कॅनडाने अमेरिकेचे ५१ वे राज्य बनावे अशी अट घातली आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये, “मी कॅनडाला सांगितले होते की जर ते वेगळे पण असमान राष्ट्र राहिले तर त्यांना $61 अब्ज खर्च येईल, परंतु जर ते आपले प्रिय 51 वे राज्य बनले तर त्यांना शून्य डॉलर खर्च येईल,” असे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”ते या प्रस्तावावर विचार करत आहेत,” असे राष्ट्रपतींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कॅनडाने अद्याप राज्यत्वाच्या दाव्याला अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही.
गेल्या आठवड्यात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या योजनांचे अनावरण केले. ही १७५ अब्ज डॉलर्सची बहुस्तरीय प्रणाली आहे, जी पहिल्यांदाच अमेरिकन शस्त्रे अवकाशात घेऊन जाईल. ओव्हल ऑफिसमधून बोलताना ट्रम्प म्हणाले की त्यांना आशा आहे की ही प्रणाली २०२९ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होईल आणि अंतराळातून सोडलेली क्षेपणास्त्रे रोखण्यास सक्षम असेल.
Donald J. Trump Truth Social 05.27.25 05:41 PM EST pic.twitter.com/XdQqIDb6De
— Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) May 27, 2025
ट्रम्पच्या ऑफरवर कॅनडाची भूमिका काय आहे? America on Canada ।
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी कबूल केले आहे की त्यांचे सरकार गोल्डन डोम कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत अमेरिकेशी चर्चा करत आहे. “कॅनेडियन लोकांसाठी सुरक्षा उपाययोजना करणे चांगले आहे,” असे मार्क कार्नी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी प्रगत क्षेपणास्त्र ढालबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेची पुष्टी केली.
‘गोल्डन डोम’ मिसाइल डिफेन्स सिस्टीम ही हल्ल्याच्या चारही आवश्यक टप्प्यांमध्ये क्षेपणास्त्र धोक्यांचा सामना करण्यासाठी जमिनीवरील आणि अंतराळातील क्षमता एकत्रित करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. प्रक्षेपणापूर्वी क्षेपणास्त्रे निष्क्रिय करणे, त्यांच्या सुरुवातीच्या उड्डाण टप्प्यात त्यांना रोखणे, त्यांच्यामध्ये व्यत्यय आणणे आणि आघात होण्यापूर्वी शेवटच्या क्षणी त्यांना थांबवणे. America on Canada ।





