फोम पेह (इंडोनेशिया) – उत्तर कोरियाच्या घातक आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्रितपणे उत्तर देणार आहे. कंबोडियामध्ये होत असलेल्या “ईस्ट आशिया आसियान समिट’ दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी याबाबतची घोषणा केली.
जपान आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांसह हा निर्धार व्यक्त करण्यात आला. बायडेन यांनी या शिखर परिषदेच्या दरम्यान जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांची भेट घेतली. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून उत्तर कोरियाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासंदर्भात चर्चा केली.
उत्तर कोरियाचे ध्यक्ष किम जोंग उन यांनी अलिकडेच दक्षिण कोरिया आणि जपानला धमकावण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र उत्तर कोरियाच्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी तिन्ही देश मिळून पुरवठा साखळी अधिक भक्कम करतील, असे बायडेन म्हणाले. चीनकडून सागरी आक्रमणाच्या धोक्याबाबत बायडेन यांनी जपान आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली.
High Voltage Drama ! तिकीट नाकारल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्याचे शोले स्टाईल आंदोलन, पहा व्हिडीओ…
अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या तिन्ही देशांच्या त्रिस्तरिय सहकार्यातून शांतता आणि स्थैर्य कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अमेरिेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले.