Pune District : आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे कामकाज उत्तम

मंचर : आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे शेतकऱ्यांच्या प्रति असलेले काम चांगले असल्याचे गौरवोद्गार खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी व्यक्त केले. आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या मंचर येथील मुख्य कार्यालयाला भेट देऊन खरेदी विक्री संघाच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सभापती विजयसिंह शिंदे पाटील बोलत होते.
यावेळी संचालक माणिक गोरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले पाटील, तज्ज्ञ संचालक अॅड. निलेश शेळके, व्यवस्थापक गणेश हुले यांच्यासह संचालक आणि सेवक वर्ग उपस्थित होते. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात शेतीमालासंदर्भात उत्पादन घेण्यासाठी खत, औषध ,बी बियाणे देऊन ग्राहक सेवा केली जाते. रास्त भावात शेतीपूरक वस्तू उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा खरेदी-विक्री संघाकडे वाढल्याचे दिसून येत असल्याचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी सांगितले.
खरेदी विक्री संघाच्या वतीने चालू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले यांनी विजयसिंह शिंदे पाटील, माणिक गोरे यांचे स्वागत केले. खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक निलेश शेळके आणि व्यवस्थापक गणेश हुले यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.





