Virat Kohli Retirement : “विराट, प्लीज रिटायरमेंट घेऊ नकोस…”, अंबाती रायुडूची किंग कोहलीला भावनिक विनंती

Ambati Rayudu request to Virat Kohli Retirement : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. शनिवारी, कोहलीने बीसीसीआयशी बोलून त्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिल्याचा दावा करणारे अनेक वृत्त समोर आले. कोहलीबद्दलच्या या वृत्तामुळे चाहते खूपच हैराण झाले आहेत, दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूने कोहलीसाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे आणि त्याला निवृत्ती न घेण्याची विनंती केली आहे.
अंबाती रायुडूची विराटला भावनिक विनंती –
भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता कोहलीबद्दलच्या अशा बातम्यांमुळे क्रिकेट जगत आश्चर्यचकित झाले आहे. रायुडूने कोहलीला निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. त्याला वाटते की विराटकडे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये खूप काही देण्यासारखे आहे.
विराटने निवृत्ती घेऊ नये –
Virat Kohli please don’t retire.. The Indian team needs you more than ever. You have so much more in the tank. Test cricket will not be the same without you walking out to battle it out for Team India.. Please reconsider..
— ATR (@RayuduAmbati) May 10, 2025
अंबाती रायुडूने लिहिले, “विराट कोहली प्लीज निवृत्त होऊ नकोस. भारतीय संघाला तुझी पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. तुझ्याकडे संघाला देण्यासाठी खूप काही आहे. तू मैदानावर उतरून टीम इंडियासाठी लढल्याशिवाय कसोटी क्रिकेट पूर्वीसारखे राहणार नाही. प्लीज निवृत्तीबद्दल पुनर्विचार कर.”
हेही वाचा – UAE vs QAT : यूएईचा टी-२० मध्ये नवा पराक्रम! १० फलंदाज रिटायर्ड आऊट करत रचला इतिहास!
अहवालानुसार, विराट कोहली आणि बोर्ड यांच्यात बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. जर विराट खरोखरच निवृत्त झाला तर तो त्याच्या खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमधील १४ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट असेल. या काळात त्याने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आणि ३० शतकेही केली. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार देखील राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले आहेत.





