घरीच घ्या थिएटरचा आनंद! मोठ्या स्क्रीनसह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट, ऑफर एकदा पाहाच

Xiaomi Smart TV Offer | ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरु असलेल्या वर्षातील सर्वात मोठ्या समर सेलमध्ये Xiaomi कंपनीच्या स्मार्ट टीव्हींना खूपच कमी किंमीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये शाओमीच्या टीव्हींवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. ब्रँडेड आणि 4K UHD रिझोल्यूशन असलेले टीव्ही खरेदी करायचे असल्यास, ही संधी ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Xiaomi च्या 55 इंच आणि 43 इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट
Xiaomi X Pro 4K 55 इंच स्मार्ट टीव्ही सध्या अमेझॉनवर 37,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत 49,999 रुपये होती. म्हणजेच तब्बल 12,000 रुपयांची थेट सूट ग्राहकांना मिळत आहे. यासोबतच, कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,500 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास आणखी 2,830 रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची संधी आहे.
तसेच, Xiaomi X Pro 4K 43 इंच टीव्ही 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह सध्या 30,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कूपन डिस्काउंटनंतर ही किंमत आणखी कमी होऊन 28,999 रुपये होते. यावरही बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,000 रुपयांची सूट आणि एक्सचेंज ऑफरअंतर्गत 2,830 रुपयांपर्यंतचा लाभ घेता येऊ शकतो.
शाओमीच्या टीव्हीचे फीचर्स
या टीव्हींमध्ये 4K UHD स्क्रीन, Dolby Atmos ऑडिओ, Google TV, वॉइस सर्च, Chromecast आणि Google Play सपोर्टसह एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. अमेझॉनवरील ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून, घरासाठी उत्तम टीव्ही खरेदी करायची असेल, तर ही डील नक्कीच चुकवू नका.





