मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत अॅमेझाॅन कार्यालयाची ताेडफाेड

Updated On:

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषेची माेहीम हाती घेण्यात आली असून या विराेधात अॅमेझाॅन कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. दिंडाेशी न्यायालयाकडून याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाेटिस बजावून ठाकरे यांच्यासह मनसे सचिवांना पाच जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातील काेंढवा भागातील अॅमेझाॅनचे कार्यालयाची ताेडफाेड करत मराठी भाषेचा आदर कराला तरच महाराष्ट्रात रहा असा इशारा देत कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली.

अॅमेझान, फिल्पकार्ट यांनी सात दिवसात मराठी भाषेत अॅप सुरु करा आणि अॅमेझाॅनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करा अशी मागणी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ आणि ‘मराठी नाय तर अॅमेझाॅन नाय’ अशी भूमिका घेतली. पुण्यातील काेंढवा परिसरात बुरहानी इंडस्ट्रीयल इस्टेट येथे अॅमेझान ट्रान्सपाेर्ट सर्व्हिसेस प्रा.लि. नावाने कार्यालय आहे.

मनसेचे सात ते आठ कार्यकर्ते सदर ठिकाणी शुक्रवारी दुपारी हातात झेंडे आणि दांडकी घेऊन घाेषणाबाजी करत आले. त्यांनी साेबत आणलेल्या काळया रंगाने प्रथम अॅमेझाॅनचे मराठी आणि इंग्रजी भाषेतील नावापैकी इंग्रजी भाषेतील नावास काळे फासले. त्यानंतर हातातील दांडक्याने कार्यालया बाहेरील सामानाची ताेडफाेड केली तसेच कार्यालयाचे काचेच्या खिडक्या फाेडल्या. याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण ही मनसे कार्यकर्त्यांनी केले.

ताेडफाेड केल्यानंतर मनसे कार्यकर्ते पसार झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी काेंढवा पाेलीस ठाण्याचे पाेलीस आले व त्यांनी कार्यालयातील ताेडफाेडीची पाहणी करत पंचनामा केला.

आणखी संबंधित बातम्या

Karad News : सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल

2026-09-05 21:21:13

Karad News : सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल

Pune Court : मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांना जामीन; पंतप्रधान मोदींचे छायाचित्र हटवल्याचे प्रकरण

2026-09-05 21:17:44

Pune Court : मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांना जामीन; पंतप्रधान मोदींचे छायाचित्र हटवल्याचे प्रकरण

Extortion News : पोलीस दलात खळबळ ! हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या कर्मचाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

2026-09-05 17:08:33

Extortion News : पोलीस दलात खळबळ ! हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या कर्मचाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण

2026-09-05 16:03:35

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

2026-09-05 15:57:29

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा