Amarnath Yatra 2024: तात्पुरती स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
Updated On:

Amarnath Yatra 2024 – काल स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. १८०० हून अधिक यात्रेकरू जम्मू बेस कॅम्पमधून अमरनाथ गुहेच्या दिशेने निघाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कलम ३७० रद्द करण्यात आलेल्या घटनेचा काल पाचवा स्मृती दिन होता.
त्यापाश्र्वभूमीवर कोणतीही स्थानिक आंदोलकांकडून कोणतीही आगळीक होऊ नये म्हणून काल ही यात्रा एक दिवसांसाठी थांबवण्यात आली होती. यंदा आत्तापर्यंत ४ लाख ९० हजाराहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ येथे जाऊन दर्शन घेतले आहे.
१८७३ यात्रेकरूंच्या३९व्या तुकडीने जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्प येथून सकाळी ३.२५ वाजता केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांच्या संरक्षणात अमरनाथच्या दिशेने कुच केले. या वार्षिक यात्रेची सुरुवात २९ जून रोजी झाली असून १९ ऑगस्ट रोजी तिचा समारोप होणार आहे.





