अमराठी अभिनेत्रीकडून मराठी सिनेमा इंडस्ट्रीचं भरभरून कौतुक; म्हणाली “इथे खूप प्रेम, आपलेपणा आणि…”

Nikita Dutta : मराठी सिनेमांना सध्या चांगले दिवस आले आहेत, असं म्हटलं तर वावगं वाटू नये. या वर्षात अनेक मराठी सिनेमांनी बॅाक्स अॅाफिस गाजवलं, त्यापैकी ‘घरत गणपती’ या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमातील कथा कौटुंबिक असल्याने ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
या सिनेमात एक अमराठी अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव निकीता दत्ता असून तिच्या अभिनयाचं कौतुक प्रेक्षकांनी केलं होतं. सध्या ती एका विधानामुळे चर्चेत आली आहे. एका मराठी कुटुंबातील गणेशोत्सव, रुढी, परंपरा, भांडणं आणि कुटुंबातील मुलाला आवडणारी अमराठी मुलगी हे सगळं कसं शिकते याची एक सुंदर गोष्ट घरत गणपती सिनेमात दाखवण्यात आली आहे.
नवरात्रीनिमित्त अभिनेत्री निकिता दत्ता एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा तिने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीत मला काही गोष्ट खूप आवडल्या ज्या मला वाटतं हिंदी इंडस्ट्रीत इतक्या बघायला मिळत नाहीत, असं विधान केलं.
पुढं ती, मी पहिल्यांदाच महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती इतक्या जवळून बघत होते. मला जाणवलं की एकमेकांप्रति इथे खूप प्रेम, आपलेपणा आणि आदर आहे. असं म्हणत अभिनेत्रीने मराठी सिनेमा इंडस्ट्रीचं भरभरून कौतुक केलं. मराठी लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळू शकत नाही. हे बघून मला खूप छान वाटलं, असंही निकिता म्हणाली.
हेही वाचा : अमेरिकेच्या विरोधी पक्षाने ट्रम्प प्रशासन कसे बंद पाडले? ; विरोधकांना इतके अधिकार कसे मिळाले ? वाचा





