Pmc Election : अमर आवळे यांचा भेटीगाठींवर भर; पर्वती दर्शन अन् लेकटाउन भागात प्रचार दौरा

पुणे : प्रभाग क्रमांक २७ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश ऊर्फ अमर विलास आवळे यांनी सोमवारी पर्वती दर्शन आणि लेकटाउन या भागातील घराघरांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी आपुलकीने त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्यासमोर लहानाचा मोठा झालेला मुलगा भाजपकडून निवडणूक लढवतो आहे, याबद्दल लेकटाउन येथे तात्पुरते राहायला गेलेल्या नागरिकांनी मनापासून आनंद व्यक्त केला.
सोमवारी सकाळी पर्वती दर्शन भागातील घरांमध्ये अमर आवळे यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी स्थानिक महिलांनी त्यांचे औक्षण केले. आवळे यांची पत्नी स्नेहल याही पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी झाल्या. भाजपच्या उमेदवारांनाच मतदान करणे का गरजेचे आहे, याची सविस्तर माहिती त्या घराघरांमध्ये जाऊन देत होत्या. आवळे यांच्याबद्दल माहिती देणारी परिचय पत्रके या वेळी वाटण्यात आली.
सोमवारी संध्याकाळी लेकटाउन परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी उपस्थित होते. आंबिल ओढा झोपडपट्टीचा पुनर्विकास सध्या सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक लेकटाउनमध्ये स्थलांतरित झाले आहेत. आवळे याच परिसरातच लहानाचे मोठे झाले. भाजपमुळे आपल्याला पक्की घरे मिळणार असल्याची भावना या वेळी नागरिकांनी व्यक्त केली





