Satara | वडूज शहराच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील

वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडूज शहराला रस्ते, पाणी, आरोग्य अशा मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. शहरात गतीने होणाऱ्या विविध विकासकामांमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण असल्याचे दिसत आहे, असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत वडूज नगरपंचायतीसाठी इमारत बांधकाम व अग्निशमन वाहनासाठी १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अग्निशमन केंद्र इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी आमदार गोरे बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. मनिषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. बंडा गोडसे, माजी सरपंच अनिल गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक जयवंत पाटील, बनाजी पाटोळे, श्रीकांत काळे, सचिन माळी, अभय देशमुख, सुनिल गोडसे,ओंकार चव्हाण,सोमनाथ जाधव, प्रतिक बडेकर,नगरसेविका रेश्मा बनसोडे,
रेखा माळी, स्वप्नाली गोडसे, मुख्याधिकारी कपिल जगताप, रविंद्रशेठ काळे, शहराध्यक्ष प्रदिप शेटे, आप्पासाहेब गोडसे, भरत घनवट, हरीभाऊ कुंभार, श्रीकांत बनसोडे, गणेश गोडसे, विक्रम रोमन, बी. आर. काळे, संदीप गोडसे, निलेश करपे आदी उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांच्या काळात खटाव तालुक्यासह शहराच्या विकासाचा शब्द आपण जनतेला दिला. जनतेला आपण दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.
येथील नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून विविध प्रभागांत अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे, विद्युतीकरण अशी कोट्यावधी रूपयांची विविध विकासकामे गतीने होत आहेत. शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामही गतीने सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल.
नगराध्यक्षा सौ. काळे म्हणाल्या, आमदार गोरे यांच्या माध्यमातून शहरासाठी नविन पाणी पुरवठा योजना तसेच अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे अशी विविध विकासकामे गतीने होत आहेत. शहरातील विकासकामांसाठी आमदार गोरे यांनी आमदार निधी तसेच वरिष्ठ पातळीवरून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.





