‘आधीच तापमान 40°c…’ अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा हॉट अंदाज

मुंबई – मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने 2011मध्ये ‘पिंजरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. इतर सेलिब्रिटींप्रमाणे संस्कृती देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
संस्कृतीने लाल रंगाच्या ड्रेसमधील तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘जाळ झाला रे…’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. या फोटोला एका चाहत्याने म्हटले की, ‘आधीच तापमान 40°c च्या पुढे गेले आहे ओ! अजुन नका वाढवू!!!’ दुसऱ्याने म्हटले आहे की, ‘निस्ताच जाळ.’
View this post on Instagram
दरम्यान, संस्कृती याआधी ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय ‘सांगतो ऐका’ निवडुंग, एफयु, शिव्या या चित्रपटातही संस्कृती झळकली होती.





