पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत येणाऱ्या दुकानदारांना,व्यावसायिकांना ट्रस्टच्यावतीने जागा वाटपाचा प्रारंभ मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन डॉ सुरेश जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव,संतोष उर्फ बाळासाहेब जाधव संतोष वाघ, सचिन देशमुख,गौरव जाधव, सरपंच घनशाम मसने, उपसरपंच विशाल जाधव, माजी चेअरमन मोहनराव जाधव शामराव जाधव गुलाबराव वाघ जगनशेठ जाधव, योगेश देशमुख, भरत मुळे,प्रदीप जाधव,राजेश देशमुख, विजयआण्णा जाधव,पृथ्वीराज जाधव अंकुशराव पाटील, सचिव विशाल माने व ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार असून दुकानदारांची ,व्यावसायिकांची रेलचेल असणार आहे. पाळणे, खेळण्याची दुकाने, मिठाई, जिलेबी दुकाने, गृहउपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने, शेतीची औजारे आदी विक्री करणारे लहान-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने येतात. यात्रास्थळ व पुसेगाव-दहिवडी रस्त्याच्या दुतर्फा ट्रस्टच्या वतीने व्यावसायिकांना अकरा दिवसासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातात.