Satara | दातेवाडी येथे लाडकी बहीण योजनेसाठी बचत खात्यांचे वाटप

वडूज, (प्रतिनिधी) – स्टेट बँक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत दातेवाडी ता. खटाव येथील महिलांची व पुरुषांची बचत खाती काढून खातेधारक महिलांना खातेपुस्तक वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस आवश्यक असणारी खाती दातेवाडी येथे जाऊन उघण्यात आली होती. ज्या पुरुषांची अद्यापही खाती नाहीत अशा पुरुषांचीही नवीन बचत खाती काढण्यात आली.
दातेवाडीचे सरपंच बाबासाहेब पवार यांनी गावतील प्रत्येक महिला व पुरुषांना भारतीय स्टेट बँकेत खाते उघण्याचे आवाहन केले. त्यानुसार वडूज शाखेचे शाखाधिकारी सुरज कुंभार यांनी दातेवाडी हे गाव दत्तकगाव म्हणून घेतले.
सर्व खातेदारांना बोलावून त्यांची शुन्य शिलकेची खाती उघण्यात आली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस खाते पासबुक आवश्यक असल्याने सर्व खातेदार महिलांना खातेपुस्तकाचे वाटप करण्यात आले. या बचत खात्याव्दारे महिलांना लाडकी बहिण योजना व शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेता येईल, असे कुंभार यांनी सांगीतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक गणेश निकम, कैलास मुंढे, वैभव सानप, सत्यवान माळवे यांचे सहकार्य लाभले.





